new01
new01
new01
23.07.22
previous arrow
next arrow

मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ प्रा.मणिकराव कीर्तने वाचनालय

      ४० वर्षीयपूर्वि ह्या नवनिर्माणधीन शहऱ्याच्या मातीत श्री गणेशाला वंदन करून सर्व कालांची अधिष्ठात्री जी सरस्वती तिची उपासना सुरू झाली. सरस्वतीची विविध रुपे अससलेला साहित्य ,संस्कृती व कालांची विविध रुपे इथे साकारली. बघता बघता ४० वर्षे पूर्ण झाली. या शहराच्या समृद्ध संस्कृति जीवनासाठी इथे बीजारोपण केले. आज त्याचा विशाल वृक्ष झाला आहे. फांदया विस्तारल्या आहेत . अनेक पक्षी, पांथस्थ आले आणि गेलेत. ऋतुचक्रा आवर्तने झालीत.बहार आले आणि गेलेत. जाताना कृतज्ञतेने वंदन करून गेलेत. काही जण घावही घालून गेले. वृक्षाने आपला धर्म पाळला.आपुलकीची ज्योत तेवेत ठेवली . त्यासाठी सहवासाचे तेल घातल. जेव्हा नवी मुंबई चा ईतिहास लिहिला जाईल तेव्हा एक पान अभिमानाने लिहिल असेलते मराठी साहित्य,संस्कृति व कला मंडळाचे. ८ फेब्रुवारी १९८० रोजी आठ तरुण एकत्र येऊन मराठी अस्मिता जोपानच्या एकाच विचारेन प्रेरित होऊन एकत्र आले आणि मराठी साहित्य,संस्कृति व कला मंडल नावाच्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेची स्थापना झाली.

      संस्थेच्या कार्यवाहनचे निवास स्थान हेच त्यावेळी मंडळाची कचेरी झाले. विविध ठिकाणांहून येथे राहवायस आलेल्या मंडळीशी हळूहळू ओळखी झाल्या .वार्षीक रु .१२/- वर्गणी घेऊन सभासद नोंदणी सुरू झाली. साधारणपणे पहिल्या सहा महिन्यात २०० सभासद झाले.सभासद एकत्र येऊन त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी म्हणून व्याखाने,संस्कृति कार्यक्रम करण्याचे ठरले.परंतु त्या साथी जागेचा मोठा प्रश्न उभा राहिला.वाशी सेक्टर १ येथील शाळेचे प्राचार्य प्रधान यांनी जागेचा प्रश्न एक झटक्यात सोडविला. शाळेचे सभागृह अशा कार्यक्रमासाठी विनाशुल्क वापरावयास देण्याचे त्यांनी मान्य केले.

कार्यक्रम

जल्लोष साहित्याचा '' साहित्य संमेलनानिमित्त
निबंध लेखन स्पर्धा

By Marathi

On October 16, 2022

जल्लोष साहित्याचा '' साहित्य संमेलनानिमित्त
निबंध लेखन स्पर्धा

By Marathi

On September 22, 2022

पुस्तकांचा खजिना

साहित्य मंदिर – डिसेंबर 2019

कार्यकारी मंडळ 2019-24

प्रा.मणिकराव कीर्तने वाचनालय

संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा दिन

छायाचित्रे

वाचत रहा

“पुस्तकासारखा निष्ठावान दुसरा कोणी मित्र नाही. ”,
“ एक उत्तम पुस्तक आपल्याला बर्‍याच अनुभवांशी जोडतो . वाचताना तुम्ही अनेक आयुष्य जगता.”

संपर्कात रहा