मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ प्रा.मणिकराव कीर्तने वाचनालय
मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ
प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय
सुमारे ४६ वर्षांपूर्वी या नवनिर्माणाधीन शहराच्या मातीत, श्री गणेशाला वंदन करून आणि सर्व काळांची अधिष्ठात्री देवी सरस्वतीची उपासना सुरू झाली. सरस्वतीची विविध रूपे म्हणजे साहित्य, संस्कृती आणि कला — हीच या संस्थेची प्रेरणाशक्ती ठरली.
बघता बघता अठ्ठेचाळीस वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण झाला आहे. या शहराच्या समृद्ध सांस्कृतिक जीवनासाठी येथे जे बीजारोपण झाले, त्याचा आज विशाल वृक्ष झाला आहे. त्याच्या फांद्या विस्तारल्या आहेत. अनेक पक्षी, पांथस्थ येथे आले आणि गेले. ऋतुचक्राची अनेक आवर्तने झाली; बहार आली आणि निघून गेली.
ज्यांनी येथे योगदान दिले, ते कृतज्ञतेने वंदन करून निघून गेले. काहींनी कधी घावही घातले, पण या वृक्षाने आपला धर्म पाळला — आपुलकीची ज्योत तेवत ठेवली. त्या ज्योतीसाठी सहवासाचे तेल
जेव्हा नवी मुंबईचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा एक पान अभिमानाने मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळाच्या नावाने सजलेले असेल.
८ फेब्रुवारी १९८० रोजी, मराठी अस्मिता जपण्याच्या एकाच विचाराने प्रेरित झालेले आठ तरुण एकत्र आले आणि त्यांनी या मंडळाची – एक सार्वजनिक विश्वस्त संस्थेची – स्थापना केली.
त्या काळी संस्थेच्या कार्यवाहाचे निवासस्थान हेच मंडळाचे पहिले कार्यालय ठरले. विविध ठिकाणांहून येथे आलेल्या मराठी मंडळींची हळूहळू ओळख होऊ लागली. वार्षिक रु. १२/- वर्गणी निश्चित करून सभासद नोंदणी सुरू झाली.
केवळ सहा महिन्यांत सुमारे २०० सभासद तयार झाले. सभासदांमधील परस्पर ओळख वाढावी म्हणून व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. परंतु त्या कार्यासाठी जागेचा मोठा प्रश्न उभा राहिला.
तेव्हा वाशी सेक्टर १ येथील शाळेचे प्राचार्य प्रधान सर यांनी हा प्रश्न एका झटक्यात सोडवला. शाळेचे सभागृह संस्थेला विनाशुल्क वापरासाठी उपलब्ध करून देण्याची त्यांनी सहृदय परवानगी दिली.
पुस्तकांचा खजिना

साहित्य मंदिर – डिसेंबर 2019
कार्यकारी मंडळ 2019-24
प्रा.मणिकराव कीर्तने वाचनालय
संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा दिन
छायाचित्रे

वाचत रहा
“ एक उत्तम पुस्तक आपल्याला बर्याच अनुभवांशी जोडतो . वाचताना तुम्ही अनेक आयुष्य जगता.”




